English भाषेबद्दल बोलू काही......

खरंतर इंग्रजी भाषेबद्दल आपल्या मनात इतकी भीती बसली आहे की आपण इंग्रजी मध्ये एखादे वाक्य बोलण्यासाठी देखील घाबरतो. लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत आपण जी भाषा ऐकतो बोलतो ती म्हणजे आपली मातृभाषा. लहान पासून मोठे होईपर्यंत आपण ही भाषा कशी शिकतो याचा थोडा विचार करू. आपण आपल्या मातृभाषेमध्ये बोलताना घाबरतो का? 

उत्तर आहे "नाही". 

जन्मतः आपल्याला कोणत्याही भाषेचे ज्ञान असते का नाही आपण जी भाषा बोलतो ती जन्माला आल्यानंतर. लहानपणी मुल बोबड्या भाषेत बोलते सुरुवातीला ते मुल फक्त काही शब्दांपासून बोलण्यास सुरुवात करते जसे की मम्मा दादा आई काका. काही काळानंतर ते पूर्ण वाक्यांमध्ये बोलू लागते ते बोलताना चुकले म्हणून आपण त्याच्यावर ओरडत नाही.या सर्व गोष्टींचा आपण आनंद घेत असतो अशा वेळेस तुम्ही कधी विचार केला आहे का जरी आपण त्या मुलाच्या बोलण्यावर रोखठोक केली तरीही ते मुल आपल्याकडून शिकण्याची प्रक्रिया चालूच ठेवते आणि एक वेळ असा येतो की की त्यांनी त्या भाषेत प्राविण्य प्राप्त केलेले असते. आपण मोठे झाल्यावर मात्र वेगळं घडतं जर आपल्यावर कोणी हसलं तर आपल्याला लगेच लाज वाटते आणि आपण पुन्हा इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत नाही इंग्रजी शिकताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की प्रयत्न केला तरच तुम्ही ही भाषा शिकू शकता.

जर तुम्ही या गोष्टीचा विचार केला तर तुम्हाला नक्की समजेल की जसे तुम्ही तुमची मातृभाषा शिकलात तसेच तुम्हाला इतर भाषा देखील अवगत करायच्या आहेत आपल्याला येत नाही आपण कदाचित चुकीचे बोलू कदाचित कोणीतरी आपल्यावर हसेल या गोष्टींचा विचार मुळात आपल्याला करायचाच नाही शिकण्यासाठी तुम्हाला लहान मुल व्हावे लागेल ज्याला भाषेच्या कोणत्याही नियमांशी काहीही घेणे देणे नसते.

इथे असे अनेकजण आहेत ज्यांचे संपूर्ण शिक्षण हे मराठी भाषेत झाले आहे परंतु जेव्हा नोकरीसाठी मुलाखतीला जावे लागले तेव्हा त्यांना इंग्रजी भाषेची गरज भासू लागली. 

बरेचसे इंग्रजी शिकताना हा सल्ला देतात की तुम्ही जास्तीत जास्त न्युज पेपर वाचा मुव्हीज पहा कोणाशी तरी इंग्रजीत बोलत रहा पण हे सगळं करताना खूप डिफिकल्टीस येतात जसे की इंग्रजी पेपर मध्ये जी भाषा वापरली जाते ती समजण्यासाठी खूप कठीण असते त्यांचा अर्थ आपल्याला समजतच नाही आणि त्याच वेळेस मनामध्ये इंग्रजी बद्दल भीती निर्माण होते इंग्रजी बोलायची तर कोणाशी कारण घरात तर इंग्रजी बोलणारे कोणीच नसेल.
त्याचमुळे इंग्रजी शिकताना कधीच डायरेक्टली न्यूज पेपर वाचण्यासाठी जाऊ नये. सुरुवात अगदी बेसिक पासून करायला हवी. जर तुम्ही मुलांचा अभ्यास घेत असाल तर त्यांच्याच बुक मधील काही सेन्टेन्सेस वाचण्याचा प्रयत्न करायचा आणि समजत नसेल तर गुगलवर सर्च करून त्याचा अर्थ समजून घ्यायचा. बुक फोटो सोबत त्यांचा मिनिंग देखील दिलेला असतो त्या मुळे ते समजण्यासाठी अधिक सोपे जाते.
मुले जेव्हा टीव्हीवर स्टोरीज किंवा कार्टून पहात असतात तेव्हा ते इंग्लिश मध्ये लावून द्यावे जेणेकरून त्यांच्या कानावर देखील इंग्रजी पडेल आणि हळूहळू ही भाषा तुम्हाला सोपी वाटू लागेल