भाषा हे एक साधन आहे जे आपल्याला आपले विचार, कल्पना आणि भावना प्रभावीपणे मांडण्यास मदत करते. भाषेच्या विशाल महासागरात सर्वनाम महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रात्यक्षिक सर्वनाम, विशेषतः, वाक्यात विशिष्ट वस्तू किंवा लोक दर्शवण्यासाठी गरजेचे आहेत. इंग्रजीमध्ये, प्राथमिक प्रात्यक्षिक सर्वनाम "This","That","These" आणि "Those" हे  आहेत. या लेखात, आपण प्रात्यक्षिक सर्वनामांचा वापर सविस्तरपणे पाहणार आहोत.

Types-of-Demonstrative-pronouns
Types of  Demonstrative pronouns 

आज आपण पाहणार आहोत This, That, These and Those  यांचा वाक्यामध्ये कशाप्रकारे वापर करायचा त्याचप्रमाणे आपण काही उदाहरणे देखील पाहणार आहोत आणि practice साठी खाली worksheet देखिल देण्यात आली आहे.

इंग्रजीमध्ये तुम्ही बऱ्याचदा This, That, These and Those  हे शब्द ऐकले असतील पण त्यांना काय म्हणतात किंवा त्यांचा कसा वापर करायचा याबद्दल थोडेसे confusion असते. तर आज आपण अगदी साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये त्यांचा वापर कसा करायचा हे शिकणार आहोत. 

This, That, These and Those  यांना काय म्हणतात?

तर This, That, These and Those  यांना एकत्रितपणे Demonstrative pronouns किंवा Demonstrative adjective असे म्हटले जाते. Such आणि one हे देखील Demonstrative pronouns आहेत.

Demonstrative pronouns (दर्शक वाचक सर्वनाम):

Demonstrative pronouns चा अर्थ होतो दर्शक वाचक सर्वनाम. 

कोणतीही दूरची किंवा जवळची वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर केला जातो त्यांना दर्शक वाचक सर्वनाम असे म्हटले जाते.

उदा. हा, ही, हे, या, ते, त्या, ती, ते.

जवळची वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी: हा, ही, हे, या

दूरची वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी: ते ,ती, तो, त्या 

जसे की,

  • हा माझा पेन आहे.
  • ते माझे घर आहे.
  • त्या माझ्या मैत्रिणी आहेत.
  • हे काय आहे?

वरील वाक्यांमधील हा, ते, त्या, आणि हे या शब्दांचा वापर सर्वनाम म्हणून केला आहे जे काहीतरी दर्शवण्याचे काम करत आहे. यांनाच दर्शक वाचक सर्वनाम असे म्हटले जाते.


लक्षात ठेवा इंग्रजी शिकताना कधीच त्याचे जसेच्या तसे भाषांतर करू नये अर्थ समजून घ्यावा आणि त्यानुसार वापर करावा. 


चला तर मग इंग्रजीमध्ये यांचा वापर कसा करावा हे समजून घेऊ.

  • This, That, These and Those या Demonstrative pronouns चा वापर सविस्तरपणे:

use of Demonstrative pronouns in detail
use of Demonstrative pronouns in detail


1. जवळ किंवा दूर असलेली कोणतीही  वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी 

उदा.

  • This is my house.
  • हे माझे घर आहे.
  • Those are trees.
  • ती झाडे आहेत. 

2. एखाद्या गोष्टीवर जोर देऊन सांगण्यासाठी:

उदा.

  • This is what I wanted to tell you.
  • हेच मला तुम्हाला सांगायचे होते.
  • I want this one not that one.
  • मला हे हवे आहे ते नाही.

3. Determiner किंवा Demonstrative adjective म्हणुन वापर.

जेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा वस्तू ची माहिती किंवा वर्णन करायचे असेल तेव्हा

उदा.

  • I like this book.
  • मला हे पुस्तक आवडते.

जेव्हा नामा आधी Demonstrative pronouns येतात तेव्हा त्यांना Demonstrative adjective असे म्हटले जाते.

4. प्रश्न विचारताना:

उदा. 

  • What is this?
  • हे काय आहे?

5. वेळ दर्शविण्यासाठी:

जसे की,

"this morning," "that evening," "these days," and "those years."

उदा.

  • This morning, I woke up early.
  • आज सकाळी मला लवकर जाग आली.

6. लोकांमधील संबंध दर्शविण्यासाठी:

जसे की,

 "this person," "that friend," "these colleagues," and "those relatives."

उदा.

  • I trust this person.
  • माझा या व्यक्तीवर विश्वास आहे.

7. Prepositions सोबत.

जसे की,

"on this side," "to that place," "in these circumstances," and "with those people."

उदा.

  • The treasure is hidden on this side of the island.
  • बेटाच्या या बाजूला खजिना लपलेला आहे.

8. Comparison करताना.

उदा.

  • This is better than that.
  • हे त्यापेक्षा चांगले आहे.

अशा अनेक प्रकारे Demonstrative pronouns चा वापर केला जातो.

  • Demonstrative pronouns व Demonstrative adjective मधील फरक.

वाक्यात जेव्हां This, That, These आणि Those नंतर क्रियापदाचा वापर होतो तेव्हा त्यास Demonstrative pronouns असे म्हटले जाते व जेव्हा नामा आधी This, That, These आणि Thoseचा वापर होतो तेव्हा त्यास Demonstrative adjective म्हटले जाते.

जसे की,

  • I like pizza. This is delicious.
  • मला पिझ्झा आवडतो. हा स्वादिष्ट आहे.

येथे "This" नामा ऐवजी वापरला आहे.

  • I like this pizza.
  • मला हा पिझ्झा आवडतो.

येथे, "हा" तुम्हाला कोणता पिझ्झा आवडतो ते दर्शवतो.

Understanding Demonstrative Pronouns: This, That, These, and Those in detail.||प्रात्यक्षिक सर्वनाम समजून घेणे: हे, ते, हे आणि ते

1.This चा अर्थ आणि वापर.

This चा अर्थ होतो हा,हे,ही.

जवळची परंतु एक वचनी वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी "This" चा वापर होतो.

Use, meaning and examples of This in detail
Understanding This in detail


उदाहरणार्थ:

  • "This book is interesting."
  • "हे पुस्तक मनोरंजक आहे."

  • "I love this song."
  • "मला हे गाणे आवडते."


  •  👕 This is my shirt.
  • हा माझा शर्ट आहे.

  • This is my book. 📖
  • हे माझे पुस्तक आहे.

  • 🏡 This is my house.
  • हे माझे घर आहे.

  • 🖋️ This is my pen .
  • हा माझा पेन आहे.

  • 👧 This is my friend.
  • ही माझी मैत्रीण आहे.

2. That चा अर्थ आणि वापर

That अर्थ होतो ते, ती, तो, त्या.

दूरची परंतु एक वचनी वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी That चा वापर होतो.

Use, meaning and examples of That in detail
Understanding That in detail


उदा.

  • That is my house.                ------🏠
  • ते माझे घर आहे.

  • Look at that flower.            -------🌹
  • त्या फुलाकडे पहा.

  • I like that movie.        ---------🎥
  • मला तो चित्रपट आवडतो.

  • That is my school.    --------🏫
  • ती माझी शाळा आहे.

3. These चा अर्थ आणि वापर

These चा अर्थ होतो या किंवा ह्या

जवळच्या पर्यंत अनेकवचनी वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी "These" चा वापर होतो.

Use, meaning and examples of These in detail
Understanding These in detail


उदा.

  • These are my friends. 👦👨👦👦
  • हे माझे मित्र आहेत.

  • I will take these apples. 🍎🍎🍎🍎🍎
  • मी ही सफरचंद घेईन.

  • I will try these shoes.👟👟👟
  • मी हे शूज वापरून पाहीन.

  • These cookies are delicious.🍪🍪🍪
  • या कुकीज स्वादिष्ट आहेत.

4. Those चा अर्थ आणि वापर

Those चा अर्थ होतो त्या

दूरची परंतु अनेकवचनी वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी "Those" चा वापर होतो.

Use, meaning and examples of Those in detail
Understanding Those in detail


उदा.

  • I remember those days as a child.    
  • मला लहानपणाचे ते दिवस आठवतात.

  • Look at those birds in the sky.                 🕊️🕊️🕊️
  • आकाशातील त्या पक्षांकडे पहा.

  • Those flowers are beautiful.                      🌹🌹🌹🌹🌹
  • ती फुले सुंदर आहेत.


Demonstrative Pronouns Worksheet 1

Easy level.

Fill in the blanks with the appropriate demonstrative pronoun (this, that, these, those).

  1. Look at ________  ball.               -------------⚽
  2. I like ________ yellow flower.🌻
  3. Give me ________ green book.       -------------📗
  4. ________ cat is sitting on the bed.    ------------🐈
  5. I have ________ blue pen.🖊️
  6. Can you see ________ big tree?    ------------🌳
  7. ________ birds are singing.🐦🐦🐦
  8. ________ cars are fast.   ---------🚗🚗🚗
  9. Pass me ________ juice, please.   ---------🍹
  10. I want ________ apple, not ________ banana. 🍌      ------------------🍎 

Answers

  1. That
  2. This
  3. That
  4. That
  5. This
  6. That
  7. These
  8. That
  9. That
  10. That, this 

Worksheet 2 

Difficulty level.

Fill in the blanks with the appropriate demonstrative pronoun (this, that, these, those).

  1. ________ is my favourite song.
  2. I prefer ________ colour over ________ one.
  3. Can you pass me ________ book on the table?
  4. ________ book on the shelf belongs to my sister.
  5. I can't decide between ________ two options.

  6. ________ house over there has a beautiful garden.
  7. I like ________ flowers in the garden.
  8. ________ mountains in the distance look majestic.
  9. ________ shoes are comfortable to walk in.
  10. ________ cookies in the jar taste delicious.

Answers:

  1. This
  2. This, that
  3. That
  4. The, this
  5. These
  6. That
  7. These
  8. Those
  9. These
  10. Those

Demonstrative pronouns

Answers:


  1. These
  2. that
  3. That
  4. Those
  5. That
  6. This
  7. That
  8. These
  9. that
  10. this