कपडे परिधान करताना ज्या क्रिया तुम्ही करता त्यासाठी कोणते शब्द वापरावे हे समजत नाही अशा वेळेस आजचा लेख तुम्हाला नक्की मदत करेल.
इंग्रजी शिकत असताना सुरुवातीला वाक्य बोलणे किंवा त्यांची जुळवणी करणे अवघड जाते अशा वेळेस तयार असलेली वाक्य बोलणे सोयीस्कर ठरू शकते. इंग्रजी शिकत असताना आपण शब्दांच्या अर्थावर जास्त भर देतो पण बऱ्याचदा ते शब्द वापरात देखील येत नाही. रोजच्या वापरामध्ये आपण अगदीच साधे शब्द आणि क्रियापद वापरतो असेच काही साधे शब्द आणि phrasal verbs वापरून तयार केलेले वाक्य खाली दिली आहेत त्यांचा सराव जर तुम्ही केलात व वाक्य बोलताना phrasal verbs चा अर्थ समजून घेतला तर अशीच नवनवीन वाक्य तुम्ही स्वतः तयार करू शकाल.
आज आपण ज्या विषयावरील वाक्य पाहणार आहोत तो विषय आपल्या अगदीच ओळखीचा आणि रोजच्या वापराचा आहे. कपडे घालताना आपण ज्या क्रिया करतो त्या क्रियांना आपण कोणते क्रियापद वापरावे तसेच ते कोणत्या वेळेस वापरावे हा आपल्याला प्रश्न पडतो त्या प्रत्येक प्रश्नाचे निरसन येथे होईल अशी आशा आहे.
चला तर मग सुरुवात करूया.
Also read: sentences using is, am, are
Sentences related with wearing clothes.
- I throw on my shirt.
- मी शर्ट घालतो. (घाईघाईने जेव्हां shirt घातला जातो तेव्हा)
- I button up my shirt.
- मी माझ्या शर्टचे बटन लावतो.
- I tuck in my shirt.
- मी शर्ट टक करतो. (Formal look साठी )
- I roll up my sleeves.
- मी माझी बाही गुंडळतो.
- I pop my collar.
- मी माझी कॉलर वर करतो.
- I turn down my collar.
- मी माझी कॉलर खाली करतो.
- I roll down my sleeves.
- मी माझी बाही खाली घेतो.
- I untuck my shirt.
- मी माझा शर्ट untuck करतो.
- I unbutton my shirt.
- मी माझ्या शर्टचे बटन काढतो.
- I take off my shirt.
- मी माझा शर्ट काढतो.
- I hang my shirt on the peg.
- मी माझा शर्ट खुंटीवर टाकतो.
- I turn the shirt upside down.
- मी शर्ट उलटा करतो.
- You have put your shirt on inside out.
- तुम्ही तुमचा शर्ट उलटा घातला आहे.
- I try on different shirts to find the right fit.
- योग्य फिट शोधण्यासाठी मी वेगवेगळे शर्ट घालून पाहतो.
- I iron my shirt to remove wrinkles.
- शर्टाच्या घड्या घालवण्यासाठी मी इस्त्री करतो.
- I fold up my shirt and put it away.
- मी शर्टाची घडी घालतो आणि तो बाजूला ठेवतो.
- I zip up my shirt for added warmth.
- अधिक गरमीसाठी मी शर्टाची चैन वर करतो.
- I take my shirt off and put on a new one.
- मी माझा शर्ट काढतो आणि नवीन घालतो.
- I put away my shirt in the drawer.
- मी माझा शर्ट ड्रॉवर मध्ये ठेवतो.
- I button down my shirt for a more formal look.
- अधिक औपचारिक दिसण्यासाठी मी शर्टाचे बटन लावतो.
- I hang out my shirt to dry.
- मी माझा शर्ट सुकन्यासाठी बाहेर ठेवतो.
- I loosen up the collar on my shirt for comfort.
- आरामासाठी मी माझ्या शर्टची कॉलर सैल करतो.
Conclusion
इंग्रजी बोलताना वाक्यांमध्ये phrasal verbs चा केल्याने ती बोलण्यास सोपी जाते तसेच त्यांच्याशी संबंधित अनेक वाक्य तयार करता येतात. जितके अधिक phrasal verbs शिकाल तितके उत्तम.
0 टिप्पण्या