आज आपण शिकणार आहोत is, am, are चा वापर कसा करायचा, कोणकोणत्या condition मध्ये करायचा तसेच is, am, are वापरताना grammar चे rules कसे फॉलो करायचे,  to be च्या रुपांचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने वाक्ये कशी तयार करायची आणि बरच काही इथे तूम्ही शिकणार आहात शेवटी तुमच्यासाठी exercise म्हणून worksheet देखिल असेल त्यामूळे लक्षपूर्वक वाचा आणि तुमचे सर्व doubts clear करा.


use of is, am, are in sentences


Use of is, am, are in detail.

Is, am, are हे to be या क्रियापदाचे रूप आहे. वाक्यात to be असा वापर न करता त्याच्या वर्तमानकाळातील  रूपांचा (is, am, are) चा वापर केला जातो. वाक्यात बऱ्याचदा helping verb म्हणुन यांचा वापर होतो. तुम्ही घरात असाल, शाळेत असाल, बाहेर फिरायला गेलेले असाल, कोणाची विचारपूस करायची असो किंवा घरातील एखादे छोटे मोठे काम असो is, am, are उपयोग प्रत्येक वेळेस होतो.

जसे की,

माझा मोबाईल कुठे आहे?

Where is my mobile? 

तुमचा मोबाईल टेबल वर आहे.

Your mobile is on the table.

अश्या प्रकारे तूम्ही am, is, are चा वापर तुमच्या conversation मध्ये करत असता अशीच काही situation नुसार वाक्यें जर तुम्ही रोजच्या जीवनात वापरली तर इंग्रजी बोलणें अधिक सोपे होईल तुमचा उच्चार आणि confidence वाढेल.

Also read - sentences using is am are 

Grammar and rules

इंग्रजी बोलताना ग्रामर चे काही rules माहिती असणे गरजेचे आहे. वाक्यात am केव्हा वापरायचा is केव्हा वापरायचा तसेच are केव्हा वापरायचा हे माहीत असणे गरजेचे आहे.

How to use is, am, are with subject?

कर्त्यासोबत am, is, are चा वापर कसा करायचा हे आपण सविस्तरपणे पाहू .

is , am, are चा वापर वर्तमान काळात केला जातो. हे to be या क्रियापदाचे रूप आहे व वाक्यात ते सहाय्यकारी क्रिया पदाचे काम करते वाक्यात त्याचा अर्थ "आहे" असा होतो.

Am चा अर्थ= "आहे "

 Am = I

I सोबत नेहमी am चा वापर केला जातो. I हे first person singular subject आहे, याचा अर्थ  प्रथम पुरुषी एक वचनी कर्ता असा होतो अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जो बोलत असतो तो first person ज्याला बोलतो त्याला second person व ज्या व्यक्ती किंवा वस्तू बद्दल बोलतो ती असतें third person. उदा.

I am hungry.

इथे I हा first person आहे , I am म्हणजेच "मी आहे" व hungry म्हणजेच "भुकेला". वाक्याचा पूर्ण अर्थ होईल,

मी भुकेला आहे.

उदाहरणे 

I am studying for my exams.

मी माझ्या परीक्षेचा अभ्यास करत आहे.

I am a vegetarian, so I don't eat meat.

मी शाकाहारी आहे, त्यामुळे मी मांस खात नाही.


using am sentences


Is चा अर्थ= आहे.

Is = He, She, It, This, That, 3rd person singular,(your sister, Her mother, my baby....)

Is चा वापर तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यासोबत केला जातो. उदा.

She is my sister.

इथे she हा third person कर्ता आहे.she is म्हणजे "ती आहे" व my sister म्हणजेच "माझी बहिण''. वाक्याचा पूर्ण अर्थ होईल.

ती माझी बहिण आहे.

उदाहरणे,

She is cooking dinner for the family.

ती कुटुंबासाठी रात्रीचे जेवण बनवत आहे.

He is tall and athletic.

तो उंच आणि खेळाडू आहे.

The car is blue in color.

कारचा रंग निळा आहे.


using "is" sentences


Are चा अर्थ= आहे, आहात, आहेत ....

Are = You, We, They, These, Those, plural (your brother's, those boy's).......etc

Are चा वापर जर कर्ता  (second person)अनेकवचनी असेल तर केला जातो. वाक्यात चा वापर कधी एकवचनी तर कधी अनेकवचनी होतो असे असले तरी you नंतर are चाच वापर होतो.

They are good friends.

इथे they हा second person अनेकवचनी कर्ता आहे they are म्हणजेच "ते आहेत'' व good friends म्हणजेच ''चांगले मित्र'' वाक्याचा अर्थ होईल,

ते चांगले मित्र आहेत.

उदाहरणे 

They are playing soccer in the field.

ते मैदानात फुटबॉल खेळत आहेत.

The flowers are blooming in the garden.

बागेत फुले उमलली आहेत.

The children are laughing and playing together.

मुले एकत्र हसतात आणि खेळतात.

senences using are


कर्त्यानुसार am is are कसे वापरायचे हे आपण शिकलो पण कोणकोणत्या situation मध्ये is, am are चा वापर होतो? हे आता आपण पुढील भागात शिकणार आहोत.

पुढील भाग : use of is am are in detail part 2 


Exercise Questions: is, am, are

Exercise Questions: is, am, are

Fill in the blanks with the appropriate form of "is," "am," or "are".