मागील भागात आपण subject नुसार helping verb कसे वापरावे हे शिकलो या भागात तुम्ही शिकणार आहात am, is, are यांचा वापर तुम्ही कोणकोणत्या situation मध्ये करू शकता.
1. No action (State of being)
जेव्हा कोणतीही क्रिया घडत नसते परंतु कर्ता एखाद्या स्थितीबद्दल सांगत असतो अशा वेळेस is, am, are चा वापर होतो. जसे कि रोजच्या वापरातील काही वाक्ये,
मी विद्यार्थी आहे.
हे माझे घर आहे.
तू खुप आळशी आहेस.
वरील सर्व वाक्यात कोणतीही कृती घडत नाही परंतु कर्ता एखादी स्थिती दर्शवित आहे. जसे की एखाद्या व्यक्तीची ओळख सांगणे किंवा माहिती देणे, quality किंवा feelings सांगणे आशा बऱ्याच प्रसंगी is,am, are चा वापर होतो. चला तर step by step पाहू.
वाक्यरचना
(Subject + am/is/are + .........)
She is my friend.
इथे she is म्हणजे "ती आहे " पण ती कोण आहे काय आहे हे सांगणे गरजेचे आहे "my friend " "माझी मैत्रीण ". म्हणजेच वाक्य पूर्ण करण्यासाठी आधी subject त्यानंतर is,am, are आणि मग तूम्ही naun वापरू शकता adjective वापरू शकता किंवा prepositional phrase देखिल वापरु शकता.
उदाहरणार्थ,
I am in the room.
मी रूममध्ये आहे.
She is my sister.
ती माझी बहिण आहे.
My mobile is so expensive.
माझा मोबाईल खूप महागडा आहे.
You are not a good girl.
तू चांगली मुलगी नाही आहेस.
वरील सर्व वाक्यात is, am, are नंतर कधी naun कधी adjective तर कधी prepositional phrase वापरण्यात आली आहे.
Conversation using is am are (State of being)
सहसा संभाषण करताना समोरच्याला प्रश्न विचारले जातात व समोरून त्या प्रश्नाचे उत्तर हा किंवा नाही असे मिळते तर कधी महिती पूर्वक किंवा पूर्ण सविस्तरपणे मिळते.
प्रश्न कसे विचारावे?
(Yes/No) question
जर प्रश्नाची सुरुवात is am are ने होत असेल तर प्रश्नांची उत्तरे हो किंवा नाही अशी असतील.
( Are + you, we, They, Those, plural + .......)
उदाहरण,
Are you a good boy?
Yes, I am a good boy. (होकारार्थी)
No, I am not a good boy. ( नकारार्थी)
( Is + He, She, It, This, That, name( singular) +.......)
उदाहरण,
Is your brother on the roof?
Yes, my brother is on the roof. ( होकारार्थी)
No, my brother is not on the roof. ( नकारार्थी)
(Am + I +......)
Am I looking beautiful?
Yes, you are looking so beautiful.
No, you are not looking beautiful.
Questions with answers in detail.
( Wh + Is/am/are + subject + .........)
प्रश्नाची सुरुवात wh family ने झाल्यास व त्यानंतर is am are चा वापर असल्यास प्रश्नांची उत्तरे सविस्तर पणे दिली जातील.
How is your mother?
She is fine.
What is the price of this pen?
Only 10 RS.
अधिक माहिती: using is am are sentences
2. Adjective जे V3 प्रमाणे वाटेल.
इथे वाक्य हे वरीलप्रमाणे कोणतीही अवस्था दाखवत असते फरक येवढाच की is, am, are नंतर adjective चा वापर केला जातो जे आपणास verb असल्याचे भासवते.
उदाहरणार्थ
I am confused.
इथे confused हे verb नसून adjective आहे. अधिक माहितीसाठी अशीच काही उदाहरणे पाहू,
He is shocked.
त्याला धक्का बसतो.
I am excited.
मी उत्साही आहे.
She is educated.
ती शिकलेली आहे.
His phone is switched off.
त्याचा फोन बंद आहे.
अधिक माहिती:
वरील सर्व वाक्यात ज्या प्रमाणे is, am, are नंतर adjective वापरण्यात आले आहे जे आपणास क्रियापदाचे तिसरे रूप आहे असे वाटते तसेच is, am, are नंतर क्रियापदाच्या ing रूपाचा वापर होतो.
म्हणजेच is, am, are नंतर कशाचा वापर करावा याच्या अनेक संभावना आहेत.
( Subject + is/am/are + naun/naun phrase/naun clause/adjective/adjective v3/adjective ing).
उदाहरणार्थ,
This is interesting.
He is interested.
This is what I like.
3. Present continuous tense.
Present continuous tense मध्ये is, am, are नंतर क्रियापदाच्या ing रूपाचा वापर होतो.
(Subject + is/am/are + ving)
उदाहरणार्थ,
I am going to school.
मी शाळेत जात आहे.
She is laughing at me.
ती माझ्यावर हसत आहे
Why is she crying?
ती का रडत आहे?
4. Is, am, are नंतर v3 चा वापर (passive voice)
जेव्हा is, am, are नंतर क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर होतो त्यास passive voice म्हटले जाते ज्यात क्रिया कोणाकडून तरी केली गेली असते.
(Subject + is/am/are + v3)
उदाहरणार्थ,
He is scolded daily.
त्याला रोज ओरडले/ शिवीगाळ केलेजाते.
I am beaten every time.
प्रत्येक वेळी मला मारहाण केली जाते.
My clothes are washed every Sunday.
माझे कपडे दर रविवारी धुतले जातात.
How many people are taught English here?
इथे किती लोकांना इंग्रजी शिकवले जाते?
5. Continues passive voice मध्ये
जसे आपणास माहीत आहे की passive voice मध्ये क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर होतो परंतु जर ती क्रीया चालू असेल तर अश्या वेळेस is, am,are नंतर being व नंतर क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते.
(Subject + is/am/are + being + v3)
उदाहरणार्थ,
She is being scolded.
तिला फटकारले/ ओरडले जात आहे.
Transaction is being processed.
व्यवहाराची प्रक्रिया सुरू आहे.
My clothes are being washed.
माझे कपडे धुतले जात आहेत.
6. Is/am/are +being + adjective
Passive voice मध्ये ज्याप्रमाणे v3 चा वापर होतो तसेच इथे being नंतर adjective वापरले जाते.
उदाहरणार्थ,
You are being so rude.
तू उद्धट वागत आहेस.
She is being helpful.
ती मदत करत आहे.
अधिक माहिती : is, am, are worksheet
आपण काय शिकलात?
Is, am, are चा वापर वर्तमान काळात केला जातो. यांचा वापर वाक्यात helping verb तर कधी main verb म्हणुन केला जातो ज्यांचा अर्थ "आहे" असा होतो.
माहिती उपयुक्त वाटल्यास share करा तसेच Facebook व telegram वर फॉलो करा.
0 टिप्पण्या